Bloodcommunity

OR

Featured image 1
रक्तदान कोण करू शकत नाही ?

❍ कुठल्याही रिक्रिएशनल अंमली पदार्थांचं इंजेक्शन घेतलं असेल तर रक्तदान करता येत नाही.
❍ गेल्या वर्षभरात असुरक्षित शरीरसंबंध ठेवणारी व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
❍ एखाद्याची एचआयव्हीची चाचणी सकारात्मक आली असेल, तर अशा व्यक्तीला रक्तदान करता येत नाही.
❍ रक्तदान करण्यापूर्वी तीन महिने आधी मलेरियावर उपचार घेतलेली व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
❍ रक्तदात्यानं रक्तदान करण्याच्या 15 दिवस आधी कॉलरा, टायफाईड, प्लेग यांची लस घेतलेली असेल तसंच रक्तदानाच्या एक वर्षापूर्वी रेबीजची लस घेतली असेल, तर त्यालाही रक्तदान करता येत नाही.
❍ रक्तदात्यानं शरिरावर टॅटू काढला असेल तर त्या तारखेपासून 6 महिन्यांपर्यंत रक्तदान करता येत नाही.
❍ हिपॅटायटीस-बी आणि सी, टीबी, एचआयव्ही आणि कुष्ठरोगाचा त्रास असलेली व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
❍ कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाचा रुग्ण रक्तदान करू शकत नाही.
❍ हृदयाशी संबंधित कोणताही आजार असेलेली व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
❍ इंजेक्शनच्या माध्यमातून ड्रग्ज घेतलेली व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
❍ जर तुम्ही दातांवरील उपचारासाठी डेंटिस्टकडे गेला असाल, तर रक्तदान करण्यासाठी तुम्हाला 24 तास थांबावं लागतं. दाताशी संबंधित मोठे उपचार सुरू असेल तर तुम्ही महिनाभर रक्तदान करू शकत नाही.
❍ त्यानुसार, बाळाच्या जन्मानंतर कमीतकमी 9 महिने आणि बाळाने दूध सोडल्यानंतर 3 ते 12 महिन्यांपर्यंत महिलेला पुरेसा आहार मिळणं गरजेचं असतं. त्यामुळे या कालावधीत रक्तदान न करण्याचा सल्ला दिला जातो.