
इतर अवयव दानांप्रमाणेच नेत्रदान म्हणजेच दृष्टिदान देखील तितकेच महत्त्वाचे आणि आवश्यक आहे. मात्र भारतात हव्या तितक्या प्रमाणात नेत्रदान होत नाही. भारतासह जगभरातील लोकांमध्ये दृष्टिदानाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी 10 जून हा दिवस जागतिक दृष्टिदान दिवस म्हणून साजरा केला जातो.
डोळ्यांमुळेच आपल्याला हे जग किती सुंदर आहे हे पाहायला मिळते. पण आज कितीतरी असे लोक आहेत ज्यांनी ना आपल्या जन्म देणाऱ्या आईचा चेहरा पाहिला आहे, ना उगवता सूर्य पाहिला आहे. सध्या जगभरात 2 कोटी 70 लाखापेक्षा जास्त लोक अंध आहेत. त्याचप्रमाणे भारतात देखील लाखो लोक अंध म्हणून जीवन जगत आहेत. भारतात दरवर्षी 2 लाख नेत्रदानाची आवश्यकता असते. मात्र केवळ 25 ते 30 हजारांच्या आसपास नेत्रदान होत असतात.त्यामुळेच नेत्रदानाविषयी जनजागृती होणे खूपच आवश्यक आहे.
अनंताच्या पलीकडे जाउनही अस्तित्व उरावं,
तुमच्या डोळ्यांतुनही कोणीतरी जग बघावं..!!
कोण करू शकतो नेत्रदान ?
भारतीय कायद्यानुसार नेत्रदान हे मरणोत्तर होते. मात्र करण्यासाठी कोणत्याही वयाची व्यक्ती नेत्रदान करु शकते. पण कित्येकदा शक्य असूनही भावनिकतेमुळे लहान मुलांचे नेत्रदान केले जात नाही.
नेत्रदान केवळ मृत्युनंतर करता येते.
बालकांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही नेत्रदान करू शकतो.
ज्यांना चष्मा आहे ते सुद्धा नेत्रदान करू शकतात.
ज्यांना ब्लडप्रेशर, डायबिटीस, दमा, इ. विकार असतील ते सुद्धा नेत्रदान करू शकतात.
मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेली व्यक्ती.
नेत्रदानास कोणत्याही धर्माचा विरोध नाही.
1) व्यक्तीला हे आजार नसावेत: ज्या व्यक्तीचे नेत्रदान करायचे आहे, त्या व्यक्तीला कोणताही दुर्धर आजार नसायला हवा. यामध्ये टीबी, HIV, एड्स, कॅन्सर, कोरोना, हीपेटायटीस असे कोणतेही आजार त्या व्यक्तीला नसावेत.
2) मृत्यूचा दाखला आवश्यक: ज्या व्यक्तीला नेत्रदान करायचे असेल, त्या व्यक्तीचा मृत्यू दाखला नेत्रदानासाठी आवश्यक असतो. तर त्यामुळे नेत्रदानाविषयी इच्छुक व्यक्तीने जवळच्या नातेवाईकांना कल्पना देणेही आवश्यक आहे.
2) वारसदाराची परवानगी आवश्यक: मृत्यूपश्चात त्या मृतदेहाची जबाबदारी त्या व्यक्तीच्या वारसाची असते. त्यामुळे त्यांच्या परवानगी शिवाय नेत्रदान पार पडू शकत नाही. तर नेत्रदानाची इच्छा मृत व्यक्तीने व्यक्त केली नसली तरी देखील वारसदार मृत व्यक्तीचे नेत्रदान करु शकतात.
कसे होते नेत्रदान ?
नेत्रदानाविषयी काही गैरसमज देखील अनेकांच्या मनात आहेत. नेत्रदान करताना कोणत्याही प्रकारचा रक्तस्राव होत नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. मृत्यूनंतर फोन केल्यावर आय बँकेचे लोक येतात. ते मृत व्यक्तीचे डोळ्यांतील कॉर्निया काढून घेतला जातो. हे काढून घेताना रक्ताचा एक थेंबही बाहेर पडत नाही.
मरणोत्तर नेत्रदानापुर्वी घ्यावयाची काळजी
इच्छुक व्यक्तीने नेत्रदानासाठी आधी नोंदणी करणे आवश्यक आहे. तर आपल्या घरातील व्यक्तींना त्याची कल्पना देणेही आवश्यक आहे. व्यक्तीच्या मृत्युनंतर 6 ते 8 तासाच्या आत नेत्रदान होणे गरजेचे असते. त्यामुळे नातेवाईकांनी लगेच आय बँकेला किंवा 1919 या टोल फ्री नंबरवर फोन करणे अपेक्षित असते. आय बँकेचे लोक येईपर्यंत त्या मृत व्यक्तीचे वर रुममध्ये फॅन चालू नसावा, त्या मृत व्यक्तीच्या डोक्याखाली 2 उशी आणि तिच्या डोळ्यांवर कापडाची ओली पट्टी ठेवणे आवश्यक असते.
Save1 | Blood Donation | Body Donation | Eye Donation | Organ Donation | Be A Hero | Donate To Be A Hero