Blood request

Patient Name*
Mobile Number*
Blood Bag*
Date*
Gender*
Blood Group*
City*
Hospital Name*
Why and how important is it for you?

❍ रक्तदान केल्यामुळे शरीरातील रक्त संपुष्टात येतं का ? किंवा शरीर कमकमुवत होतं का ?

रक्तदान केल्याने शरीरातील रक्त संपतं, हा गैरसमज आहे. प्रौढ शरीरात सरासरी 5 लिटर रक्त असतं. रक्तदान करताना 450 मिली रक्त आपल्या शरीरातून बाहेर काढलं जातं. निरोगी व्यक्तीच्या शरिरात तेवढं रक्त 24 ते 48 तासांत पुन्हा तयार होतं.

रक्तदान केल्याने शरीर कमकुवत होतं, असंही अनेकांना वाटतं. पण हा समज पूर्णपणे चुकीचा आहे.

कारण रक्तदान केल्यानं शरीरात नवीन रक्त आणि रक्तपेशी तयार होण्याची प्रक्रिया जलदगतीनं होते. रक्तदानामुळे झालेली रक्ताची हानी शरीर काही दिवसांत भरुन काढतं.

❍  रक्तदान केल्याने संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता आहे का?

रक्तदानासाठी रक्त घेताना डिस्पोजेबल निडल्स वापरल्या जातात. तसेच घेतलेल्या रक्ताच्या वेगवेगळ्या चाचण्या करुन रक्त सुरक्षित असल्याची खात्री केली जाते. त्यामुळे रक्तदान केल्यानं आजारांचा संसर्ग होत नाही.

रक्तदान करताना एकदा वापरलेलं इंजेक्शन पुन्हा वापरलं जाणार नाही, ही गोष्ट कटाक्षानं पाळावी लागते.

Save1 b