रक्तदान करण्यापूर्वी आणि केल्यानंतर काय खावे?
रक्तदान केल्यानंतर काही लोकांना चक्कर येते किंवा अशक्तपणा जाणवतो. अशा परिस्थितीत रक्तदान करण्यापूर्वी आणि नंतर काय खावं, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.
❍ रक्तदान करण्यापूर्वी किंवा रक्तदानादरम्यान रक्तदात्यानं उपवास केलेला नसावा. रक्तदानापूर्वी कमीतकमी 4 तास अगोदर त्यानं जेवण केलेलं असावं.
❍ तसंच रक्तदात्यानं रक्तदानापूर्वी दारू प्यायलेली नसावी, असं NACO च्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगितलं आहे.
❍ रक्तदान करण्यापूर्वी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. तसंच रक्तदान करण्यापूर्वी तुम्ही लोहयुक्त पदार्थ जसे चिकन, अंडी, मासे, हिरव्या पालेभाज्या, रताळे, बीन्स, बीट, ब्रोकोली, इत्यादी हिरव्या भाज्या खाऊ शकता.
❍ रक्तदान केल्यानंतर तुम्ही तुमच्या आहारात फळांचा समावेश करू शकता. फळांच्या सेवनानं अशक्तपणा आणि थकवा दूर होण्यास मदत होते.